gold market jansamuh.in

दसऱ्यानंतर उतरलं सोनं.. काय आहेत आज सोन्याचे दर?

दसऱ्याला सोने खरेदी करतांना सोन्याच्या दरात उंचाक असला तरी आज दसऱ्यानंतर राज्यात असलेल्या सोन्याच्या मुख्य बाजारपेठासाठी फेमस असलेल्या शहरातील सोन्याच्या दुकानातुन मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात काही अंशी घट झाल्याचे दिसून आलेे तर आज शुक्रवारी बाजार उघडताच सोन्याच्या भावात काही प्रमाणात घट नोंदविल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

विजयादशमीला सोने खरेदीची पंरपरा पाहता मागील आठवड्याभरापासून सोन्यच्या किमती वाढत असल्याने साेन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यावर गुंतवणुकदारांनी सुध्दा नफा बुक करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच सोन्याच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली तसेच अमेरिकेचे असलेले चलन डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचे मुल्य घसरलेेे आणि जागतीक स्तरावर सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली.

ही बातमी वाचा Health News-पपईची पाने बहुगणी- दुर्गम आजारावर ठरते प्रभावी!

कॉमेक्सवरील प्रारंभीच्या व्यापरात सोने 0.05 टक्के म्हणजेच दोन डॉलरच्या घसरणीसह 3,866.10डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसले.त्याचवेळी गोल्ड स्पॉट दर 0.39 टक्के म्हणजेच 14.83 डॉलरच्या घसरणीसह 3841.72डॉलर प्रति औंसवर व्यवहार करतांना दिसला

येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात घट कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञांचे मत अाहे. तरी सोने खरेदी करण्यापुर्वी बदलणारे रोजचे दर आणि बनावट शुल्क तपासणे महत्वाचे राहील.

जळगांवच्या सोने बाजारात बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर एकाच दिवसात दोन हजारापेक्षा अधिक वाढले. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर एक लाख 21 हजार 746 रुपये या उच्चांकावर पाहेचले होते मात्र गुरुवारी कोणतीच दरवाढ झालेली नाही तर उलट 206 रुपयांची घट नोंदविल्याने सोने प्रति 10 ग्रॅम एक लाख 21 हजार 540 रुपयापर्यंत खाली आले होतेे.

नाविन्यपुर्ण बातम्या व घडामोडी साठी जनसमूह न्युज चॅनल च्या व्हॉटसॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा येथे क्लिक करा

 

तर आज शुक्रवारी सकाळी सोन्याच्या बाजारात 412 रुपयांची घट नोंदविली गेल्याने आजचा सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम एक लाख 21 हजार 128 रुपयेे होता. मागील वर्षी दसऱ्याच्या तुलनेनुसार यंदा सोन्याच्या दरात तब्बल 42 हजारापेक्षा जास्त असल्याचे समोर आले असून सोने विक्रीच्या उलाढालीत 10 ते 20 टक्कयांनी घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून कळते.

Scroll to Top