शेगांव- शेगांव बस स्थानकात सुविधांचा अभाव असून स्थानिक अागर व्यवस्थापक व प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत आहे. तर नुकताच बसस्थानकातील स्लॅप कोसळला असला तरी या ठिकाणी होणारी जिवीत हानी टळली असली तरी याबाबत प्रशासन कानाडोळा करीत असल्यामुळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने काँग्रेस शहराध्यक्ष कैलास देशमुख उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग डॉ. असलम खान व प्रकाश शेगोकार अध्यक्ष काँग्रेस किसान सेल यांनी आगर व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करीत शेगांव बस स्थानकातील समस्यांचा पाढाच वाचला. शेगांव बस स्थानक हे नेहमीच प्रवाश्यांच्या वर्दळीने गच्च असते.
ही बातमी वाचा –विभागस्तरावर बुध्दीबळाच्या पटात घेणार शेगांवचे खेळाडु सहभाग
शेगांव शहरात व तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची तसेच ग्रामीण प्रवाश्यांची बस सेवेला असलेलीे प्राथमिकता पाहता येथे गर्दी करीत असले तरी या ठिकाणी सुविधांचा अभाव असतो. स्वच्छता गृहामध्ये स्वच्छतेचा अभाव, प्रवाश्यांना पिण्याकरीता नळ बिल न भरल्यामुळे पिण्याचा अभाव अनाठायी व्यवसनाधिनांचा मुक्त संचार, माेकाट जनावरे, कुत्रे यांच्याकरीता हे हक्काचे ठिकाण होवून बसले आहे.
असलेल्या बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य असून या इमारतीची डागडुजी करण्याकडेही महामंडळाचा कानाडोळा होत आहे.
महाराष्ट्रातील युती शासन हे विकासाच्या गप्पा मारत असले विदर्भ पंढरी येथील बसस्थानकाची दुरावस्था ही केवलवाणी असल्याची तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
तरी याबाबत प्रशासनाने त्वरीत उपाययोजना राबवावी अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष कैलास देशमुख यंानी दिला आहे.
