कु.आस्था सचिन ढमाळ चा वाढदिवस मंतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसाेबत केला साजरा
शेगांव- आज रोजी वाढदिवस म्हटला की, हजारो रुपयांचा खर्च करण्याची आणि प्रसिध्दी मिळविण्याची जणु स्पर्धा लागलेली असतांना सुध्दा या प्रसिध्दीला बगल देत मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत भोजनदान करीत कु. आस्था चा वाढदिवस साजरा केला. आज स्थितीला प्रसिध्दीचा हव्यास असल्यामुळे अनेक जण बॅनर व इतर मौजमजेच्या पार्ट्या साजरा करुन आपला वाढदिवस साजरा करीत असले तरी ढमाळ परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे कौतुक आज समाजातुन व्यक्त होत आहे.
शेगांव शहरातील युवा उद्योजक सचिन ढमाळ तसेच भाजपाचे जेष्ठ नेते दिपक ढमाळ यांनी आपल्या चिमुकलीचा वाढदिवस मतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत साजरा करीत साजरा करण्याची संकल्पना राबविली आणि वाढदिवसाच्या दिवशी स्थानिक बाळापुर रोड स्थित मतीमंद विद्यालयात सदर विद्यार्थ्यांसोबत जेवण घेवून तसेच वाढदिवसाचा केक कापुन नावीन्युर्ण पध्दतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांच्या या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
ही बातमी वाचा –अखेर त्या ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
तरी वाढदिवस आणि त्यासाठी होणारा अनाठायी खर्च हा विद्यार्थ्यांसोबत आनंदात साजरा करण्याची भुमिका असल्याचे मत ढमाळ परिवाराने व्यक्त केले. या प्रसंगी मतीमंद विद्यालयाकडून कु. आस्थास भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. ढमाळ परिवाराने मतीमंद विद्यालयातील मुलांसोबत वाढदिवस साजरा केल्याने मतीमंद मुलांच्या वागणुकीला सुध्दा चालना मिळण्याच्या दृष्टीने उचलले पाऊल हे नक्कीच प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रीया संस्थेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

Comments are closed.