महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आता ओळखपत्र हे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या कार्यपध्दतीमध्ये पारदर्शकता आणावी याकरीता प्रशासनाच्या वतीने या अगोदरही असे आदेश काढले असले तरी याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती तसदी न घेतल्यामुळे शासनाच्या वतीने आज दि. 10 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कठोरता दर्शविण्यात आली आहे.
ही बातमी वाचा –महिला बचत गट ठेव संचय संकल्पनेतून राजलक्ष्मी अर्बन जनसेवेत रुजु
आज प्रकाशित झालेल्या शासनाच्या आदेशामध्ये प्रशासन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी ओळखपत्र न वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आले असून याबाबत संबधित कार्यालयाचे अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे निर्देेश आज जाहीर झालेल्या आदेशात दर्शविण्यात आले आहे.
आज दि. 10 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत…
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक जीएडी-३२०३६/३१/२०२५-जीएडी (रवका-१.)
६३१, मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन ४०००३२.
दिनांक : १० सप्टेंबर, २०२५.
वाचा –
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आयएनडी-११७९/४४/अठरा (रवका), दि.०६.०२.१९८०.
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.०७.०५.२०१४ व दि.१०.१०.२०२३.
शासन परिपत्रक.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.०७.०५.२०१४ द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.१०.१०.२०२३ द्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला.
२. असे असताही, काही शासकीय अधिकारी/कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत असे निदर्शनास आले आहे.
३. म्हणून, आता पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत-
१) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे.
२) कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणा-या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
४. वरील परिच्छेद ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांची राहील.
शासन परिपत्रक क्रमांकः जीएडी-३२०३६/३१/२०२५-जीएडी (रवका-१.)
५. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०९१०१८०५५२२७०७असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by SHAHAJAHAN SHAKUR MULANI Date: 2025.09.10 18:06:46+05’30’
(शहाजहान मुलाणी) शासनाचे उपसचिव.
प्रति,
१) मा. राज्यपाल यांचे सचिव, राज भवन, मुंबई.
२) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
४) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
५) मा. उप मुख्यमंत्री, नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६) मा. उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
७) सर्व मा. मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधान भवन, मुंबई.
