मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) – सात दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन होणार असल्याने मुंबईसह राज्यात कडक पोलीस बंन्दोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा कडक बन्दोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही गणेश भक्तांना विसर्जनावेळी काही अडचण येऊ नये म्हणुन प्रशासनाच्यावतिने काळजी घेण्यात येत आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावतिने भांडुप पश्चिम येथे कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली असून भांडुप परिसरातील गणेश भक्तांनी या ठिकाणी गणेश मुर्तींचे विसर्जन केले.
ही बातमी वाचा –मोठी बातमी- मराठा आंदोलकासह मुंबईतील मराठा समाजाला दोन दिवस पुरेल एवढेे अन्नदान आझाद मैदानावर..
भांडुप येथील कृत्रिम तलावात आज दुपार पासूनच गणेश विसर्जनाला सुरवात झाली. खासदार संजय दिना पाटील यांनी या तलावाची निर्मिती केली आहे. दिड दिवसांपासून ते सात दिवसांपर्यंतच्या गणपतींचे या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन प्रशासनाच्यावतिने विशेष पोलीस बन्दोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोठ्या तलावाच्या ठिकाणी सुरक्षा गार्ड, अग्निशमन दलाचे अधिकारी, पालिका प्रशासन तसेच पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणुन अनेक ठिकाणी एकेरी तर काही ठिकाणी गणेश भक्तांसाठी विशेष मार्गिका करण्यात आली आहे. त्यासाठी वाहतुक पोलीस यावर लक्ष ठेऊन आहे.
