Prabhag Prarup Rachana Google map

ब्रेकिंग न्युज – शेगाव प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा सदोष व दिशाभुल करणारा-निलेश घोंगे

 

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

शेगांव- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होवू घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक कार्यक्रम घोषित केला असून त्याचा एक भाग म्हणुन भौगोलिक सिमा व प्रारुप प्रभाग रचना बाबतचा शेगांव शहराचा नकाशा प्रकाशित करण्यात आला असून तो सदोष व सर्वसामान्यांची दिशाभुल करणारा असल्याची हरकत प्रहार संघटनेचे नेते निलेश घोंगे यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी तथा निवडणुक आयोगांकडे सादर केली आहे.

 

राज्यामधील निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार घेणे अनिवार्य असतांना त्यामध्ये प्रशासनाची निष्काळजी ही सर्वसामान्यांच्या हितावर आघात करीत असल्याची संतप्त प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.

आज प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांचा जिल्हा दौऱ्यादरम्यान ते शेगांव येथे आले असता सदर हरकतीचे निवेदन त्यांना सुध्दा सादर केले आहे. त्यावर वरीष्ठांकडे  यांची तक्रार करणार असून सर्वसामान्याच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचे काम प्रशासनाकडून होत असल्याबाबत ताशेरे ओढले आहेत.

ही बातमी वाचा –हरविलेल्या इंदौर चा बेपत्ता बालक ‘यथार्थ’  आरपीएफ च्या प्रयत्नामुळे होणार परिवाराच्या स्वाधिन 

राज्यात निवडणुका पारदर्शक व्हाव्यात असा प्रशासनाचा तसेच निवडणुक आयोगाचा उद्दात हेतु असला तरी आज हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत  नकाशा सदोष असल्याची जाण कुठल्याच अधिकाऱ्याला झाली नाही.

 

त्यामुळे हरकती नाेंदवितांना सदर नकाश्यावर प्रभाग क्र. 8 दोन वेळा नमुद असल्याने तसेच प्रभाग क्र. 5 ची नोंद दिसून येत नसल्याने परिशिष्ट 5 च्या सह कलमानुसार केलेली प्रभाग रचना ही सदोष व दिशाभुल करणारी ठरत असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. तरी याबाबत निवडणुक आयोगाकडून संबधित अधिकाऱ्यांना कोणता सबब देण्यात येतो. वा नागरिकांची झालेली दिशाभुल बाबत काय अंमलबजावणी करण्यात येईल हा येणारा काळच ठरवेल.

 

तरी सदर सदोष नकाशा असला तरी प्रभाग रचनेबाबत हरकती साठी आज शेवटचा दिवस असल्याने याबाबत सतर्कता बाळगत हरकत दाखल करावी असे आवाहन प्रहारचे नेते निलेश घोंगे यांनी  केले आहे.

Scroll to Top