शेगांव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून मोकाट कुत्रे हे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. शेगांव शहरातील वाढती लोकसंख्या पाहता नागरी वस्त्या वाढल्या आहेत. रात्री अपरात्री बहुतांशी वस्त्यामध्ये पथदिव्यांचा अभाव असल्याने हे मोकाट कुत्रे नागरिकांच्या घरात घुसुन भितीचे वातावरण निर्माण झाले.
नुकतेच काही महिन्यापुर्वी शेगांव शहरातील बाजार फैलातील लहान मुलीला चावा घेतल्याची घटना घडली. त्यानंतरही रस्त्यावर मोकाट कुत्र्याचा संचार हा दुचाकी धारकांना तसेच नागरिकांना भयावह होत आहे. कारण मोकाट कुत्रे चावा घेतील का ही धास्ती मनात घर कायम करुन राहत असल्याने या माेकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी नगर परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा. अशी मागणी जनसामान्यांकडून होत आहे.
ही बातमी वाचा –ब्रेकींग न्युज- प्रभाग रचनेच्या हरकती व सुचना नोंदविण्याकरीता न.प. कार्यालय सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत राहणार सुरु
व्यंकटेश नगरात कराळे यांच्या घरात कुत्रे घुसत धुमाकुळ घातला या ठिकाणी या कुत्रांचा बंदोबस्त करणे नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी असतांना सुध्दा खाजगी माणसांकडून पकडण्याची जबाबदारी नागरिकांवरुन येवून ठेपल्याने डोकेदुखी वाढली आहे.
मोकाट कुत्रे न.प. कार्यालयात सोडण्याची आली वेळ- माजी नगरसेवक दिनेश शिंदे
शेगांव नगर परिषद हद्दीत मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. त्याबाबत नगर परिषद प्रशासन कुठलीच कारवाई करीत नाही. तरी आता नगर परिषद प्रशासन हे प्रशासकीय स्तरावर चालविण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या मुलभुत सुविधा पुरविण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाचे डोके जागेवर आणण्यासाठी मोकाट कुत्रे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात सोडण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रीया माजी नगरसेवक दिनेश शिंदे यंानी जनसमूह शी बोलतांना दिली.
तरी शेगांव शहरातील सर्वच प्रभागाकरीता मोकाट कुत्र्यांची स्थिती भयावह झाल्याचे वास्तव्य शहरात असल्याची माहिती माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांनी दिली.
