आज अनेकांची आर्थिक परिस्थीती बरोबर नसल्याने घराची जबाबदारी संभाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य होत नाही. व शिक्षण घेण्याची ईच्छा आहे. परंतु शिक्षण अर्ध्यावर सुटले आहे. अशा इच्छुक विद्यार्थ्यांकरीता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी – मार्च 2026 मध्ये दहावी व बारावी च्या परीक्षेला खाजगी रित्या प्रविष्ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ऑनलाईन पध्दतीने उद्या दि. 31 ऑगस्ट पर्यंत हा अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थीती कुमकुवत असल्याने अनेक विद्यार्थी काम करीत असल्याने त्यांचे शिक्षण अपुर्ण राहते अशा विद्यार्थ्यांकरीता ही 17 नंबर अर्ज भरुन दहावी बारावीची खाजगी रित्या परीक्षेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी शासनाच्या वतीने परीक्षेला खाजगीरित्या बसण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
ही बातमी वाचा –प्रभाग प्रारुप करीता हरकती नोंदविण्याकरीता उरले फक्त 4 दिवस
तरी ईच्छुकांनी 17 नंबरचा अर्जासह शुल्क भरावे लागते. इच्छुक विद्यार्थ्यांना 31 अॉगस्टपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज आणि शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतित मुळ कागदपत्रे निवडलेल्या शाळेत जमा करावी लागणार आहे
काय असणार पात्रता
किमान पाचवी पास उत्तीर्ण असावा, वयाची 14 वर्षे पुर्ण झालेली असावीत.तर दहावी नंतर अकरावी- बारावी करीता खंड पडला असेल असेही विद्यार्थी अर्ज भरु शकतात.
आवश्यक कागदपत्रे
अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दखला, नसल्यास प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो तसेच मेल आयडी व मोबाईल नोंदणीनुसार ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
तरी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणाऱ्यांकडून सदर अर्ज आज आणि उद्याच्या तारखेत भरता येईल. त्यानंतर वाढीव शुल्क भरुन तारखेनंतरही भरण्याबाबत इंटरनेट कॅफे संचालकांकडून तसेच शिक्षण विभागातील तज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घ्यावी.
