लाखोचा पगार घेणाऱ्या महिलांनी सुध्दा घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, पडताळणीत सत्य उघड
बुलढाणा जिल्हयातील जि.प. अंतर्गत असलेल्या 199 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
महाराष्ट्र राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारच्या वतीने मध्यप्रदेशात कार्यान्वित असलेल्या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका लागण्या अगोदर केली असली तरी प्रारंभीला सरसकट अर्ज दाखल केलेल्या सर्वच महिलांना लाभ दिला एवढेच नव्हे तर निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदरच अगाऊ हप्ता देवून सुध्दा खुश केले. परंतु आता प्रशासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेला नव्या निकषाची कात्री लावण्यात आली असल्याने आता पडताळणी प्रक्रीया जोमात सुरु झाली आहे.
नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनातील महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने नव्या निकषाची चाळणी लावण्याकरीता पडताळणी प्रक्रीया सुरु केली असतांना या प्रक्रीयेत पुरुषांनी सुध्दा लाडक्या बहीण योजनेच्या निधीवर डल्ला मारल्याचे समोर आले असून आता प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. आहे. तरी आता लाडकी बहीण योजनेकरीता पडताळणी प्रक्रीयेत अनेक सत्य समोर आले आहेत.
ही बातमी वाचा –श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात
राज्यभरातील हजारो शासकीय सेेेवेेेेत महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
ही लाडकी बहीण योजना ही आर्थिक कुमवकुवत असणाऱ्या महिला लाभार्थ्यांकरीता असली तरी शासकीय पगार घेणाऱ्या महिलांनी सुध्दा या योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले अाहे.
जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असलेल्या 1 हजार 182 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहेे. त्यात बुलढाणा जिल््हयातील 199 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता शासनाच्या वतीने आजवर घेतलेला लाभाची रक्कम वसूल करण्याची तयारी सुरु असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश राज्यभरातील जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण होणे या कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट येणार असल्याचे चित्र आहे. बुुलढाणा जिल्हा परिषदेच्या 199 कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
बुलढाणा जिल्हयातील 51 हजार महिला लाभार्थी रडारवर
आता शासनाच्या वतीने पडताळणी प्रक्रीया सुरु केली असल्यामुळे अनेक निकषाअंतर्गत 51 हजार महिला लाभार्थी रडारवर आहेत.
199 कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
शासकीय सेवेत असतांना सुध्दा लाडकी बहीण होण्याचा मोह न आवरणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून आजवर घेतलेली लाभाची रक्कम सुध्दा वसुुल करण्यात येणार आहे.तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र प्रशासनाकडून मिळणार असल्याची माहिती बुलढाणा जि.प. कडून मिळाली आहे.
