Shri Gajanan Maharaj Sansthan Shegaon

श्री.ग.म.संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला काल दि. २४ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. श्री संस्थानच्या वतीने हा उत्सव सोहळा धार्मिकतेला अनुसरुन पार पडत असतो.
श्री संत गजानन महाराजांचा ११५ वा पुण्यतिथी उत्सव दि.२४ ऑगस्ट २५ ते दि.२९ ऑगस्ट २५ पाच दिवस दररोज श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ ऑगस्ट २५ रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही बातमी वाचा –गणेश उत्सवाची तयारी जोशात, सार्वजनिक घरगुती उत्सवाची जय्यत तयारी

श्रींच्या मंदिरात पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, सकाळी ७.१५ ते९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० हरी किर्तन.दि.२४ ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे रा. पुसद दि.२५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. भरत बुवा जोगी रा.परळी दि.२६ ऑगस्ट रोजी ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते रा. शिरसोली दि.२७ ऑगस्ट रोजी ह. भ. प. भरत बुवा पाटील रा. म्हैसवाडी दि. २८ ऑगस्ट रोजी ह भ प बाळू बुवा गिरगावकर रा.गिरगाव.

श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन

दि. २८ ऑगस्ट वार गुरुवार रोजी ह.भ.प. श्री भरत बुवा पाटील म्हैसवाडीकर यांचे सकाळी ७ ते ९ श्रींचे समाधी सोहळ्या निमित्त कीर्तन होणार आहे.

या उत्सवात श्री गणेशयागास व वरूणयागास दि.२४ ऑगस्ट रोजी आरंभ होवून दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. यागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान श्रीचे ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत होईल तर दुपारी उत्सवाची पालखीचे श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन होवून श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, पताका टाळकरी, अश्‍वासह परिक्रमा निघेल.

 

सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा व श्रींची आरती होणार आहे.
दि.२९ ऑगस्ट रोजी ह.भ.प.प्रमोद बुवा राहणे पळशी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल व नंतर दहीहंडी गोपाळकाला यांच्या कार्यक्रम होणार आहे. श्रींचे पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर व परिसरात रंगबेरगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांब व आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात येवून भक्तीमय वातावरण असून श्रींच्या नामघोषात भक्त तल्लीन होत महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, विदर्भसह मध्ये प्रदेशातील भजनी दिंड्यांचा ज्ञानोबा तुकाराम यांच्या नामघोष करीत संत नगरीत श्रींच्या पुण्यतिथी उत्सवात सहभागी होत आहेत.

भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रीचे दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे.भक्तांना कोणताही त्रास होवू नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या उत्सव काळात सर्वतोपरी सोयीसुविधा संस्थानच्यावतीने पुरविल्या जात आहेत.

Comments are closed.

Scroll to Top