Maharashtra

गणेश उत्सवाची तयारी जोशात, सार्वजनिक घरगुती उत्सवाची जय्यत तयारी

प्राख्यात ठिकाणाहून अनेक कलात्मक मुर्त्या बाजारात विक्रीसाठी

महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव गणेश उत्सव या उत्सवाची परंपरा ही अनेक शतकाची असली तरी महानगरासोबत आता शहरे आणि ग्रामीण भागातही या उत्सवाची सार्वजनिक पध्दतीने साजरा करण्याची प्रथा वाढीस लागली आहे. तरी हिंदु रितीरिवाजाप्रमाणे हा उत्सव घरातही साजरा करण्यात येतो. कोकणामध्ये या उत्सवाला प्राधान्य देत असून या गणेश उत्सवादरम्यान सवोर्तोपरी आनंद लुटण्याची प्रथा जरी कोकणात असली तरी आता गावपातळीवर या उत्सव काळामध्ये निर्माण केलेली वलये ही अविरत सुरु आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ही बातमी वाचा –गणेश उत्सव काळात मुंबई- मडगांव वंदेभारत धावणार 16 डब्यांची,पण किती दिवसासाठी?

 

आता गणेश स्थापना ही 27 ऑगस्ट होणार असल्याने गणेश उत्सवाकरीता लागणारी साहित्य आकर्षक मुर्त्या बाजारात विक्रीसाठी आणण्यात अाल्या असून त्या सजविण्याचे काम सर्वोतोपरी व्यापारी वर्गाकडून होत असल्याचे वास्तव्य शहरा शहरातील चाैकामध्ये तसेच मुख्य मार्गावर दुकानेे थाटलेल्या व्यवसायिकांकडून होत असल्याचे पहावयास मिळत आहे. बैल पोळा झाल्यापासून या व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटण्यास ुरुवात केल्याची चित्र विविध शहरातील मुख्य मार्गावर पहावयास मिळत होते.

गणेश उत्सवाला महागाईचे संकट

वाढत्या महागाईचा फटका गणेश उत्सवाला बसला असल्याने यावेळी मिळणाऱ्या गणेश मुर्ती सुध्दा महागल्या असल्याची प्रतिक्रीया व्यापारी वर्गाकडून होत अाहे. यावेळी वाढते पेट्रोल दर आणि वाहतुकीच्या फटक्यामुळे गणेश मुर्त्या महागल्या आहेत. तर गणेश मुर्ती सजावट करण्याकरीता लागणाऱ्या साहित्याच्या दरातही मोठी वाढ करण्यात आल्यामुळे या गणेश उत्सव महागाईचा राहणार असल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

प्राख्यात ठिकाणाहून निर्मीत मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध

महाराष्ट्रात गणेश मुर्ती निर्माण करणाऱ्या प्राख्यातांकडून तयार करण्यात आलेल्या मुर्ती शहरात अनेक व्यवसायिकांच्या वतीने विक्रीसाठी आणण्यात आल्या आहेत. तरी या वेळी गणेश मुर्ती महागल्या असल्याने भक्तंामध्ये नाराजी जाणवत असल्याचे संागितले.

Comments are closed.

Scroll to Top