8 ऐवजी सोळा डबे होवूनही बुकींग खुले होताच आरक्षण तासाभरात फुल्ल
कोकणामध्ये गणेश उत्सव हा महत्वपुर्ण उत्सव सोहळा असतो याकरीता मुंबईत असलेली चाकरमनी आपल्या गावी या काळात जाण्यासाठी उत्सुक असतात परंतु याकाळात रेल्वे रिझर्वेशन मिळत नसल्याने अक्षरशः तासनतास उभे राहून जाण्याची प्रवाश्यांवर पाळी येते तरी गणेश उत्सवाची लगबग पाहता रेल्वे विभागाच्या वतीने मुंबई मडगांव या वंदेभारत एक्सप्रेसला 8 ऐवजी 16 डबे लावण्याचा निर्णय घेताच कोकण मध्ये जाणाऱ्या प्रवाश्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले
तर बुकींग सुुरु होताच आरक्षण हे फक्त तासाभरात फुल्ल झाले असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
ही बातमी वाचा –तंत्रशिक्षण विभागाची मुलींसाठी 2 हजार मानधन योजना
गणेश उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या 8 डब्याची मुंबई मडगांव या वंदेभारत एक्सप्रेस ही 16 डब्यांची चालविली जाणार आहे. यासाठी कोकण समितीच्या वतीने केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. मुंबई – मडगांव वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यापासून या गाडीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. प्रांरभी पासून या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी या प्रतिसादामुळे सदर गाडी 16 किंवा 20 डब्यांची चालविण्याची मागणी होती. तरी रेल्वे विभागाने या प्रतिसाद दिला आहे.
तरी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहीती नुसार 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये ही वंदेभारत आठ ऐवजी 16 डब्यांची धावणार आहे. तरी या गाडीच्या 6 दिवसामध्ये डाऊन आणि अप च्या प्रत्येकी 3 फेऱ्या होणार आहेत. तरी गणेशउत्सव काळात 8 डब्याऐवजी 16 डब्याचा या गाडीमुळे प्रवासी गर्दी कमी होण्यास वाव मिळाला अाहे. तरी आता वंदे भारत चे तिकीट बुक करणे सोयीचे होणार असल्यचे सांगितले.

Comments are closed.