जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांनी पक्षाबद्दल दर्शविली सकारात्मकता
शेगांव- बुलढाणा जिल्हयामध्ये सक्रीय असलेले शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख शांतराम दाणे यांच्या विरोधात 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देणार असल्याची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करीत अनेक आरोप कार्यरत असलेले जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्यावर केले आहे. तरी या वृत्तामुळे संपुर्ण जिल्हयामध्ये खळबळ उडाली आहे. अाजस्थितीला पक्ष आणि पक्षातील गट तट हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. परंतु जिल्हयामध्ये असलेल्या व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या तालमीत राजकारणाचे धडे घेणाऱ्या जिल्हाप्रमुख यांच्यावर 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने महायुतीच्या राजकाणात खळबळ निर्माण असल्याचे बोलल्या जात आहे.
तरी पक्ष श्रेष्ठी कुणाला देणार पाठबळ!
तरी शिवसेना सारख्या पक्षामध्ये हुकुमशाही दाखवित मनमानी करीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांच्या वतीने करण्यात आला असुन माजी मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तरी राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचा जेष्ठ नेत्याबद्दल असलेला रोष जिल्हयात प्रथमच पहावयास मिळाला असल्याने चर्चेला उत आला असला तरी याबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागल्या आहे. तरी गटातटाचे राजकारण या स्थितीवर कधीच पोहचले नसल्याचे आता राजकीय तज्ञ म्हणत आहेत.
40 पदाधिकाऱ्यांनी तक्रारीबाबत जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की,मी बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंदजी दिघे आणि माजी जिल्हा संपर्क प्रमुख तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ध्येय धोरणानुसार या पक्षात शाखा प्रमुख या पदापासून कार्यरत आहे.
ही बातमी वाचा –मोबाईलच्या कर्जाचे हप्त न भरल्यास होणार फोन लॉक
अाणि तेव्हापासून सत्ता असो वा नसो मी पक्षासोबत एकनिष्ठ राहीलो असून जनतेची कामे करण्याबरोबरच पक्ष वाढीला मी प्राधान्य दिले आहे. एवढेच नाही तर मी माझे काम प्रामाणिकपणे करीत असल्याने तसेच वरिष्ठकांकडून पक्ष वाढीसाठी मिळालेल्या आदेेशाची अंमलबजावणी करण्याबाबत माझ्या अंतर्गत असलेल्या कार्यरत पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीबाबतत सुचना देणे आणि पक्षाचा प्रचार प्रसार करणे हा माझा स्वार्थ आहे.
आणि तोच गुन्हा मी केेलेला आहे. वरिष्ठांनी महायुती करीता भाजपासोबत एकसंघतेने लढण्याचे आदेश दिले असल्यामुळे मी त्यांच्या सहकार्याने कृउबास असो वा जिल्हा परिषद असो या ठिकाणी माझे अस्तित्व कायम ठेवले आहे. आणि याकरीता मला मतदार रुपी जनतेचा पाठिंबा असतो. एवढेच नाही. तर महायुतीचा धर्म पाळण्याकरीता मी नेहमीच सक्रीय असतो. प्रारंभीपासून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामपुर तालुक्यासह घाटाखाली असलेल्या तालुक्यामध्ये मी सर्वोतोपरी पक्ष वाढीचा विचार करीत वाटचाल करीत आहे.
तरी माझी कार्यपध्दती ही माझ्या अंतर्गत कार्यरत पदाधिकाऱ्यांना न जोपासणारी असली तरी या प्रकरणी पक्ष श्रेष्ठींचे आदेश माझ्यासाठी महत्वपुर्ण असल्याचे शिवसेना प्रमुख शांताराम दाणे यांनी सांगितलेे. तरी माझ्यावर झालेली तक्रार ही निरर्थक असून मी पक्षासोबत तसेच माझ्या कार्यकक्षेत असलेल्या जनतेसोबत एकनिष्टता जोपासत असल्याचे मत शांताराम दाणे यांनी व्यक्त केेले आहे.
तरी या तक्रारीबाबत तक्रारकर्त्यांसोबत संपर्क होवू न शकला नाही. तरी बुलढाणा जिल्हयातील राजकीय पक्षाचे वाद इतक्या मोठ्या स्तरावर पोहचतील अशी शक्यता नसतांना सुध्दा घडलेला प्रकार हा चर्चेचा ठरु लागला आहे. हे विशेष.

Comments are closed.