तालुकाप्रमुख रामा थारकर यांच्या अथक प्रयत्नाला मिळाला प्रतिसाद
शेगाव/ प्रतिनिधी
केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव तालुक्यातील माटरगाव शेगाव आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरामध्ये 3210 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 200 रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे
बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २७ नोव्हेंबर रोजी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मोफत भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन हरिभक्त परायण श्री अनंत महाराज भेंडे यांच्या हस्ते झाले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डिवरे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ प्रशांत तांगळे गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत जलंब चे ठाणेदार सांगळे, सईबाई मोटे रूग्नालय शेगाव येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमोल नाफडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सौ.दिपाली बाहेर, वैद्यकीय अधिकारी जलंब डॉ मनोज ठोंबरे, तालुका को-ऑर्डीनेटर आशा वर्कर्स डॉ अनिता भगत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर, इनायत उल्ला खान , राजू भाऊ देवचे , रवीभाऊ ईटखेडे, अमोल मुंडाले, स्वप्निल उमाळे,सौ.मयुरी पाटील महिला संघटक, मंगेश गायकी, आशिष मिरगे, अनिल जुमळे यांची उपस्थिती होती.
ही बातमी वाचा – नेत्यांचा मुव्हि ट्रेंड ठरतोय चर्चेचा!
यावेळीधनंजय फरांदे आणि श्री अतुल पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या शिबिरा मध्ये अस्थीरोग, हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदू, नाक कान घसा, बालरोग, कर्करोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, आदींचे तज्ञ तपासणी करणार असून, ईसीजी, रक्तगट तपासणी करण्यात आली शिबिरात नेत्र रुग्णाची तपासणी करून नेत्र रुग्णांना 1700 चष्मे वाटप करण्यात आले. एका लहान गावात मोठ्या शिबिराचे आयोजन केल्याने नागरिकांच्या वतीने आयोजकांचे सत्कार करण्यात आला .
ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या आरोग्यप्रती जागरूकता करणे आवश्यक असल्याने या शिबिराचे आयोजन केले होते अशाच प्रकारचे शिबिर प्रत्येक सहा महिन्यात आयोजित करण्याचा मानस आहे या शिबिरा साठी आशाताईं आणि सीआरपी ताई यांचेसह सर्व आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे
तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोचली पाहिजे आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा हे सूत्र अंगीकारून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेगाव शिवसेनेच्या वतीने या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या यशस्वी भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक राजू भोर यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले
